नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणे चुकीचे – रोहित पवार

573

देशात नोटबंदी झाल्यावर लोकांना रांगेत उभे राहावे लागले होते. तत्कालीन राज्य सरकारने कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या पत्नीसह रांगेत उभे रहावे लागले. शिष्यवृत्तीसाठी युवकांना रांगेत थांबावे लागले. त्याच पद्धतीने आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी देशातील नागरिकांना संविधानाला डावलून रांगेत उभा करणे, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

‘आपल्या देशातील नागरिकांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असेल, तर हे चुकीचे आहे,’ अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. ‘देशात हक्कासाठी जर कोणी शांततेत आंदोलने, निदर्शने करत असतील, तर त्यांच्यावर कोणीही हात उगारू नये. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आला. अनेक ठिकाणी लाठीमार करण्यात आला, या घटनांचा निषेध करतो,’ असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या