Rohit Sharma – क्रिकेटमध्ये ‘हे’ 5 विक्रम करणारा रोहित एकमेव खेळाडू, तिसरा तर मोडणे अशक्य

1632

टीम इंडियाचा सलामीवीर आणि एक दिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मागील 6 वर्षात आपल्या धुव्वाधार खेळीने क्रीडा चाहत्यांचे मनोरंजन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीला यथातथाच असणाऱ्या रोहितने 2014 नंतर ‘हिटमॅन’ हे नाव कमावले. रोहित सध्या टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा समजला जातो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने शिखर गाठले असून एक दिवसीय क्रिकेटच्या 50 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला जमले नाही असे विक्रम त्याने रचले.

1. एका विश्वचषकात 5 शतक

rohit
रोहित शर्मा याने 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात सलामीला खेळताना 5 शतक ठोकली. विश्वचषकाच नाही तर कोणत्याही मालिकेत एका फलंदाजांने ठोकलेली ही सर्वाधिक शतक आहेत. 144 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात नजर टाकल्यास फक्त विंडीजच्या क्लायड वालकॉट (Clyde Walcott) यांनी 1955 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 5 शतक ठोकले होते.

2. सलग 10 एक दिवसीय मालिकेत शतक

rohit-sharma
सलग 10 एक दिवसीय मालिकेत कमीतकमी एक शतक ठोकणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. रोहितने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून 2018-19 मध्ये विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेपर्यत प्रत्येक मालिकेत शकत ठोकले. रोहितच्या आधी असा विक्रम करणाऱ्या खेळाडूने सलग 6 मालिकेत शतक झळकवली होती.

3. 250 प्लस धावा

rohit1
एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिल 264 धावांचा विक्रम आहे. 13 नोव्हेंबर, 2015 ला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहितने हा विक्रम केला होता. क्रिकेट इतिहासात 250 पेक्षा अधिक धावा करणारा रोहित एकमेव खेळाडू असून त्याच्या नावावर सर्वाधिक 3 द्विशतक आहेत. हा देखील एक विक्रम आहे.

4. सलग 7 कॅलेंडर इयरमध्ये 50 प्लस सरासरी व 500 हुन अधिक धावा

rohit-sharma
रोहित शर्मा याने 2013 ते 2019 या 7 कॅलेंडर इयरमध्ये 50 पेक्षा अधिक सरासरीने आणि 500 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. याआधी अशी कामगिरी सलग 5 कॅलेंडर इयर करता आली होती.

5. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात षटकार ठोकून शतक

rohit-shama
एक दिवसीय, टी-20 आणि कसोटी असा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात षटकार ठोकून शतक झळकवणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या