
आयपीएलची शान आणि 15 पैकी 9 जेतेपदे जिंकणारे आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सोळाव्या मोसमातला पहिला सामना शनिवारी वानखेडेवर खेळला जातोय. सलामीच्या सामन्यात हार सहन करणारा मुंबई इंडियन्स आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर चेन्नई आपला दुसरा विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
मुंबईला आपल्या सलामीच्या सामन्यात बंगळुरूकडून आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. आता एक आठवडय़ाची विश्रांती घेत नव्या दमाने मुंबई आपल्या घरच्या मैदानावर उतरतेय. चेन्नईचा संघ आपल्या दुसऱया सामन्यात नो बॉलने हैराण झाला होता. तरीही ते जिंकले होते. आता त्या विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सज्ज असला तरी मुंबईच्या चाहत्यांसमोर खेळताना त्यांच्यावर दडपणही असेल.
कर्णधार रोहित शर्माला मुंबईकरांच्या दडपणालाही सामोरे जावे लागणार आहे. गेल्या मोसमातील अपयशी फलंदाजी रोहितला आताही सतावतेय. बंगळुरूविरुद्ध त्याने जोरदार सलामी दिली होती, पण तो आपल्या खेळीला मोठी करू शकला नव्हता. त्यामुळे रोहितला आपल्या फलंदाजीची चमक दाखवावीच लागेल. वानखेडेची बाऊंड्री लाइन कमी असल्यामुळे इथे षटकारांचा वर्षाव करणे अवघड नाही. सूर्यकुमार नुकत्याच झालेल्या मालिकेत अपयशी ठरला होता, पण तो आपले अपयश धुऊन काढण्यासाठी वानखेडेवर उतरणार आहे. तिलक वर्माने आपली चुणूक दाखवली आहेच, पण सर्वात महागडय़ा कॅमेरून ग्रीनला फलंदाजीचा कमाल दाखवावाच लागेल. अन्यथा मुंबईला चेन्नईसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारणे कठीण असेल. त्यातच वानखेडेची खेळपट्टी फिरकीली पोषक असल्यामुळे मोईन खान आणि मिचेल सँटनरची फिरकी प्रभाव पाडू शकते. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चर, अर्शद खान आणि कॅमरून ग्रीनवर असेल.
आकडे मुंबई-चेन्नईचे
मुंबई आणि चेन्नईत आतापर्यंत 34 सामने झाले असून 20 सामन्यांत मुंबईने बाजी मारली, तर चेन्नईला 14 सामन्यांत विजय मिळविता आला आहे.
2019 च्या मोसमात मुंबई आणि चेन्नई यांच्यात चार सामने झाले आणि चारही सामन्यांत मुंबईत विजय मिळवले. तसेच 2015 साली चेन्नईने तिन्ही सामन्यांत मुंबईला नमवले होते.
उभय संघ आजवर चारवेळा फायनलमध्ये आमने-सामने आले. 2010 साली चेन्नईने हरवले, तर 2013, 2015 आणि 2019 साली मुंबईने आयपीएलचा करंडक उंचावला.
मुंबई इंडियन्स –रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेवीस, तिलक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमरून ग्रीन, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, रिले मेरेडीथ, हृतिक शौकिन, अर्शद खान, डुआन जेनसन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोपाल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश मढवाल
चेन्नई सुपरकिंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अजय मंडल, निशांत सिंधु, राजवर्धन हंगर्गेकर, मिशेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंह, मथिसा पथिराना, महीश तिक्ष्णा, भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. ने. र. गुण
लखनौ 3 2 1 1.358 4
गुजरात 2 2 0 0.700 4
पंजाब 2 2 0 0.333 4
कोलकाता 2 1 1 2.056 2
राजस्थान 2 1 1 1.675 2
चेन्नई 2 1 1 0.036 2
बंगळुरू 2 1 1 -1.256 2
दिल्ली 2 0 2 -1.703 0
मुंबई 1 0 1 -1.981 0
हैदराबाद 2 0 2 -2.867 0
टीप ः सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट.
ही आकडेवारी लखनौ-हैदराबादपर्यंतची आहे.
अव्वल फलंदाज
फलंदाज सा. धावा सरासरी 4 6
ऋतुराज 2 149 74.50 7 13
मायर्स 3 139 46.33 12 9
धवन 2 126 126.00 15 3
कोहली 2 103 103.00 9 5
सॅमसन 2 97 48.50 8 5
अव्वल गोलंदाज
गोलंदाज सा. वि. सरासरी 4 वि. 5 वि.
मार्क वूड 2 8 07.87 0 1
बिश्नोई 3 6 06.25 0 0
वरूण 2 5 08.20 1 0
एलिस 2 6 11.40 1 0
राशीद 2 5 11.40 0 0





























































