तिन्ही शिफ्टमध्ये काम करताय? ‘हे’ धोके वेळीच ओळखा

1411

नोकरीच्या निमित्ताने अनेक जण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. खासगी नोकरीमध्ये तर मॉर्निंग, सेकंड, नाईट शिफ्ट असतेच आणि दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ही शिफ्ट रोटेट होते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. वेगवेगळ्या शिफ्ट करणाऱ्यांच्या जीवनशैलीत आणि शरिरावरही याचा परिणाम होतो.

  • वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचा आहारात निष्काळजीपणा होत असल्याचे एका सर्व्हेतून दिसून आले. यामुळे पचन यंत्रणा बिघडते. प्रत्येक आजाराचे केंद्र पोट असल्याने याचा थेट परिणाम शरिरावर होतो.

rotate-work

  • शरिराला पोषक अन्न मिळत नसल्यामुळे आणि खाण्याच्या वेळाही निश्चित नसल्याने त्याचा परिणाम पचनशक्तीवर होतो. त्याचे दुष्परिणाम झोपेवरही होतात.

rotating-shift

  • रोटेट शिफ्ट करणाऱ्या बहुतांश लोकांची झोप पूर्ण होत नाही. झोपण्याची वेळ आणि तास निश्चित नसणे, माहित नसलेल्या ठिकाणी झोपणे, स्लीप शेड्यूल गडबडणे अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागतं. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.

headache

  • निश्चित शिफ्टमध्ये काम न करणाऱ्या लोकांना वेळेशी जुळवून घेताना कामाचा ताणही सहन करावा लागतो. यामुळे ते सतत तणावाखाली असतात.

sleep

  • निसर्गनियमानुसार जेव्हा त्यांना झोपायचं असते, तेव्हा त्यांना जागावं लागतं. यामुळे त्यांचं जैविक घड्याळ बिघडते. योग्य काम करण्यासाठी त्यांच्या मेंदूवर सतत दबाव असतो. यामुळे डोकेदुखीची समस्या मागे लागते.
आपली प्रतिक्रिया द्या