आरपीएफचे ‘ऑपरेशन थंडर’, 23 तिकीट दलालांवर कारवाई

274

सुट्टीच्या हंगामात रेल्वे तिकिटांना प्रचंड मागणी असताना मध्य रेल्वेच्या पाच डिव्हिजनमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने एकाच वेळी छापा टाकून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या 23 तिकीट दलालांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीची 742 आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

सणासुदीच्या काळात लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. अशावेळी नाडलेल्या प्रवाशांना गाठून त्यांच्याकडून अवाच्यासवा पैसे आकारून गैरमार्गाने त्यांना रेल्वेची आरक्षित तिकिटे विकली जात असतात. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ डिव्हिजनमध्ये एकाच वेळी हे धाडसत्र करण्यात आले. या धाडीत अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येऊन त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. आरपीएफचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक यांच्या देखरेखीखालीऑपरेशन थंडरअंतर्गत येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त केलेली आरक्षित तिकिटे रद्द करण्यात येणार आहेत.

प्रथमच सायबर सेलची मदत

रेल्वेवरील अनधिकृत तिकीट दलालांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलानेऑपरेशन थंडरसुरू केले आहे. या ऑपरेशन थंडरसाठी पहिल्यांदाच आरपीएफने पुणे सायबर सेलची मदत घेतली आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर बनावट आयडीद्वारे आरक्षित तिकिटे काढली जात असून त्यांचा छडा लावणे जिकिरीचे बनले आहे. ही  तिकिटे दामदुप्पट दराने गरजूंना विकली जातात

आपली प्रतिक्रिया द्या