
भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध दर्शवला आहे. हिंदुस्थानातील सर्व भाषा राष्ट्रीय भाषा आहेत, असं म्हणत संघाने त्रिसूत्री भाषा धोरणावरून भाजपचे कान टोचले आहेत.
आज दिल्लीत आरआरएसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघ प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले आहेत की, “आरआरएसची खूप आधीपासून अशी भूमिका आहे की, हिंदुस्थानातील सर्व भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक जण आपल्या भागात आपल्याच भाषेत बोलतो. प्रत्येकाचा आग्रह ही आहे की, प्रथमिक शिक्षण हे आपल्याच मातृभाषेतून व्हावे.”