गायींना कत्तलखान्यापर्यंत पोहचवणारे हिंदू ठेकेदार, सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत

552

गोमातेची परंपरा सांगणारा आपला देश गायीमध्ये देवांना पाहतो. मात्र, याच देशात गायीचा सांभाळ करण्यास लोक नकार देतात. हिंदूंकडूनच गायीला कत्तलखान्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाते. सर्वाधिक ठेकेदार हे हिंदूच आहेत, अशी खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

‘गोविज्ञान संशोधन संस्थे’ तर्फे आयोजित मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत म्हणाले, गाय ही विश्वाची माता आहे. ती जमीन, पक्षी, प्राणि आणि मनुष्यासाठी गाय उपयुक्त आहे. ज्या कारागृहांमध्ये गोपालन केले जाते. तेथील कैद्यांची गुन्हेगारी मानसिकता कमी होते. हे सिद्ध झाले आहे. कुठल्याही कामासाठी संघटन, दुरदृष्टीची गरज आहे. अनेक वर्षांपुर्वी रामजन्मभुमी असलेल्या अयोध्येत राममंदिर बांधण्याचे स्वप्न पाहीले. तेच आज सत्यात उतरत आहे. पाश्चिमात्य देशात दुध आणि मांस यासाठी गाय पाळली जाते. मात्र, आपल्याकडे गोबर, गोमुत्र आणि पवित्र काताकरण यासाठी गायीचे पालन केले जाते. गाय ही मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करते. आज गोरक्षणाचा प्रचार, प्रसार आणि गो संवर्धनाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. शहरी भागातही हे प्रमाण वाढायला हवे, असेही भागवत यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या