सरसंघसंचालक भागवत विदेशी माध्यमांना ‘संघ’ समजावून सांगणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीबाबत जागतिक पातळीवर आजही अनेक समज गैरसमज आहेत. संघाची विचारसरणी आणि कामगिरीबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने सरसंघचालक मोहन भागवत हे प्रथमच विदेशी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

संघाच्या विचारसरणीबाबत चुकीची माहिती देशविदेशात पोहचविण्याचे काम काही लोकांकडून होत आहे. जम्मूकश्मीरमधील 370 कलम हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर आरएसएसला दोष देत संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघसंचालक भागवत हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विदेशी माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

पाकिस्तानी माध्यमांना निमंत्रण नाही

दिल्लीत होणार्‍या या पत्रकार संमेलनास आंतरराष्ट्रीय स्तरावरील 70 माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र यापासून पाकिस्तानी माध्यमांना दूर ठेवण्यात येणार आहे. भागवत हे विदेशी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधणार असून त्याची प्रसिद्धी करता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या