कोणी निवृत्त व्हावे, असे मी म्हटले नव्हते; 75व्या वर्षी निवृत्तीवरून मोहन भागवत यांचे मोठे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाच्या 75व्या वर्षी निवृत्तीवरून मोठे विधान केले आहे. “वयाच्या 75व्या वर्षी निवृत होण्याची आवश्यकता नाही. मी निवृत्त होणार नाही आणि कोणालाही निवृत्त होण्यास सांगणार नाही. आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपण काम करू शकतो”, असे मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दिल्लीत मोहन भागवत पंच्याहत्तरीच्या निवृत्तीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर दिले.

पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे!

“मोरोपंतजी यांच्या विधानाचा उल्लेख करून मी माझे विचार व्यक्त केले होते. मी निवृत्त होईन किंवा दुसऱ्या कोणी निवृत्त व्हावे, असे मी म्हटले नव्हते. आम्ही आयुष्यात कधीही निवृत्त होण्यास तयार आहोत आणि संघाला आमच्याकडून जोपर्यंत काम करून घ्यायचे आहे तोपर्यंत आम्ही संघासाठी काम करण्यास तयार आहोत”, असे मोहन भागवत स्पष्ट केले.

सगळे प्रयत्न संपल्यावर जनता आठवते! भागवतांचा रोख मोदींवर