
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सहा महिन्यांपूर्वी संघ मुख्यालय, रिझर्व्ह बँक आणि काही इमारतींची रेकी केली होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून नागपूरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जम्मू-कश्मीरात एका दहशतवाद्याला सुरक्षारक्षकांनी जेरबंद केले. त्याच्याकडून नागपुरातील रेकीची माहिती उघड झाली. जुलै 2021 मध्ये जैशच्या काही दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून क्राइम ब्रँच त्यावर तपास करत आहे.




























































