आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतलीय, मंत्रालयही तेच चालवतात! – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्थेचा ताबा घेतला असून मंत्रालयही तेच चालवत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. ते लडाख येथे बोलत होते.

आरएसएसचे लोकंच सर्वकाही चालवत आहेत. प्रत्येक संस्थेत त्यांची लोकं घुसवली आहेत. एवढेच नाही तर केंद्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला विचारले तर ते सांगतील की त्यांच्या खात्याचा कारभार ते स्वत: चालवत नाहीत. आरएसएसने नियुक्त केलेले ओएसडी हा कारभार हाकत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि राज्यघटनेने स्वातंत्र्याला बळकटी दिली. राज्यघटनेच्या व्हिजनला पाठिंबा देणाऱ्या संस्था स्थापन करण्यात आल्या. मात्र भाजप आणि आरएसएस या संस्थांच्या प्रमुख पदांवर आपल्या लोकांना बसवत आहेत. ती लोकंच सर्वकाही चालवत आहेत. सत्ताधाऱ्यांनीच अशी व्यवस्था निर्माण केली असून प्रत्येक संस्था आरएसएसचे लोकं चालवत आहेत.

विविधतेत एकता हिच देशाची ताकद आहे. मलाही लोकांमध्ये मिसळून खुप शिकायला मिळाले. मी वेगवेगळ्या राज्यात गेलो, तिथल्या लोकांना भेटलो. बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. त्याऐवजी काही राजकारणी द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात धन्यता मानतात, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने बोट कापण्याचा प्रकार मन सुन्न करणारा – नाना पटोले

जम्मू-कश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी लेह-लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी लडाखमधील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत तरुणांशीही चर्चा केली. लेह-लडाखच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पँगॉग लेकपर्यंतचा प्रवास बाईकवरून पूर्ण केला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)