
देशाचा आज 79 वा स्वातंत्र्यदिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत लाल किल्ल्यावर सलग 12 व्यांदा ध्वजारोहण केले. यावेळी देशाला संबोधित करताना त्यांनी RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कौतुक केले. देशवासियांना केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RSS चे कौतुक केले आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्णन जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षे देशाची सेवा केली आहे. संघाच्या 100 वर्षांच्या सेवेचा देशाला अभिमान आहे. संघ राष्ट्र उभारणीसाठी काम करतो. राष्ट्र उभारणीसाठी समर्पित आरएसएस जगातील सर्वात मोठी स्वंयसेवी संस्था आहे, अशा शब्दांत मोदी यांनी राष्ट्र उभारणीत RSS च्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातील सर्वात मोठी NGO! पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, राजकीय वर्तुळात चर्चा pic.twitter.com/Y3zyWickxI
— Saamana Online (@SaamanaOnline) August 15, 2025
आपण अभिमानाने सांगू इच्छितो की 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही संघटना जन्माला आली. राष्ट्राची 100 वर्षे सेवा हा एक अभिमानास्पद, सुवर्ण अध्याय आहे. ‘व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण’ या संकल्पाने, माँ भारतीच्या कल्याणाच्या उद्देशाने, स्वयंसेवकांनी आपले जीवन आपल्या मातृभूमीच्या कल्याणासाठी समर्पित केले… अशा प्रकारे, आरएसएस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. त्यांना 100 वर्षांच्या समर्पणाचा इतिहास आहे, असे मोदी म्हणाले. देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी RSS चे कौतुक केल्याने याची चर्चा होत आहे.