आयफोन 18 मध्ये मिळणार मोठी बॅटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगनंतर आता आयफोन चाहत्यांना आयफोन 18 सीरिजची उत्सुकता लागली आहे. 2026 च्या सप्टेंबर महिन्यात आयपह्न 18 सीरिज लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फोनमध्ये मिळणाऱ्या फिचर्ससंबंधी माहिती लीक होण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीकडून अद्याप या सीरिजची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. आयफोन 18 प्रो सीरिजमध्ये कंपनी नवीन ए20 प्रो चिप देऊ शकते. आयफोन 18 प्रोमध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले तर आयपह्न 18 प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याचाच अर्थ डिस्प्ले साईज आधीच्या फोन एवढीच असेल. परंतु डिझाईन नवीन पाहायला मिळू शकतो. आयफोन 18 प्रो मॅक्स मॉडल थोडा जाडा असण्याची शक्यतासुद्धा आहे. फोनची फ्रंट डिझाइन आधीच्या तुलनेत जास्त क्लिन आणि प्रीमियम दिसेल.