डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडी, 94.82 ची नीचांकी पातळी गाठली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता कमी असल्यामुळे हिंदुस्थानी रुपयाची घसरगुंडी सुरूच आहे. आज रुपयाने 94.82 रुपये प्रतिडॉलर ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली. रुपया आज डॉलरच्या तुलनेत 86 पैशांनी घसरून बंद झाला. कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे रुपयाने गटांगळी खाल्ली.