रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत 93 चा टप्पा ओलांडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या हिंदुस्थानच्या चलनाला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी बाजारात व्यवहार सुरू होताच रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निचांकी पातळीला पोहोचला. रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरने ९३ रुपयांचा टप्पा ओलांडला असून आता रुपयाचा भाव ९३.२४ वर पोहोचला आहे.

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे कल वाढला आहे. क्रूड ऑईलच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलरच्या वर गेल्या आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम रुपयावर झाला आहे.

तसेच शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेतल्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे.