युक्रेनच्या हल्ल्यांना रशिया घाबरला! नेव्ही डे परेड रद्द करण्याची नामुष्की

गेल्या तीन वर्षांपासून चिवटपणे लढणाऱया युक्रेनचा बलाढ्य रशियाने धसका घेतला आहे. युक्रेन सातत्याने प्रतिहल्ले करत असल्याने घाबरलेल्या रशियावर पहिल्यांदाच नेव्ही परेड रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

नौदल दिनी सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन नौदलाचे संचलन होते. यात देशाचे अध्यक्षही सहभागी होतात.नौदलाच्या जवानांना मार्गदर्शन करतात, मात्र यंदा ही परेड रद्द करण्यात आली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नौदल दिन सोहळ्यातही भाग घेतला नाही. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जवानांना संबोधित केले. तीन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा हे युद्ध काही दिवसांतच संपेल, असे बोलले जात होते, मात्र युक्रेनने चिवट झुंज देत रशियाला अक्षरशः जेरीस आणले आहे. नुकतेच युक्रेनने रशियातील वेगवेगळय़ा शहरांवर 100 ड्रोन डागले. त्यातील 10 ड्रोल हल्ले सेंट पीटर्सबर्गमध्येही झाले. त्या पार्श्वभूमीवर रशियाने नेव्ही डे परेड रद्द केल्याचा निर्णय घेतला.