गर्लफ्रेंडचे होते दुसऱ्याशी अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडने केली निर्घृणपणे हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

गर्लफ्रेंडचे दुसऱ्या कुणासोबत तरी सूत जुळल्याचे समजल्यानंतर एका तरुणाने तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या लहान भावाच्या हाताचे तुकडे करत त्याची देखील हत्या केली. रशियातील नोवोरोस्सियस्क येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षाच्या अक्षिन गुसिनोवला अटक केली आहे.

अक्षिन व त्याची गर्लफ्रेंड विक्टोरिया मकारोवा यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे पती पत्नीसारखे एकत्र राहत होते. मात्र विक्टोरिया ही अक्षिनला फसवत दुसऱ्या पुरुषाला देखील डेट करत होती. विक्टोरियाच्या वागण्यात बदल होत असल्याने अक्षिन खूप वैतागत होता. त्यावरून त्यांची खूप भांडणं देखील व्हायची. त्यामुळे अक्षिनने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसांपूर्वी अक्षिन घरी आला व त्याने विक्टोरियाला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीमुळे अर्धमेली झालेल्या विक्टोरियाला तो बाथरूममध्ये घेऊन गेला व तिथे तिची त्याने हत्या केली. या दरम्यान विक्टोरियाचा 9 वर्षाचा भाऊ देखील त्याच्या तावडीत सापडला. त्यानंतर अक्षिनने निर्घृणतेच्या सर्व सीमा पार करत त्याची देखील हत्या केली. त्याने त्या मुलाचे हात देखील तोडले.