
गुरुवारी रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात 50 जणांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले. आयएफएएक्सच्या मते पूर्व अमूर प्रदेशात विमानाचा ढिगारा सापडला आहे. विमानातील सर्व प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. हे विमान AN-24 प्रवासी विमान होते आणि ते सायबेरियाच्या अंगारा एअरलाइन्सद्वारे चालवले जात होते.
अंगारा एअरलाइन्सचे हे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते. रॉयटर्सने आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा या शहराजवळ जाताना विमान एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) रडार स्क्रीनवरून गायब झाले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
रशियाचं 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता, चीनच्या सीमेजवळ अचानक रडारवरून झालं गायब
सकाळी 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अचानक रडारवरून गायब झाले. तेव्हापासून अपघाताची भीती होती आणि आता विमानाचे अवशेष सापडले आहेत. स्थानिक आपत्कालीन सेवांनी ही माहिती दिली. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने सांगितले की, विमानाचा अवशेष सापडला आहे. हे विमान रशिया-चीन सीमेवर असलेल्या ब्लागोवेश्चेन्स्क शहरातून टिंडा शहराकडे जात होते. सायबेरियाच्या अंगारा एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे हे विमान टिंडा विमानतळापासून काही मैल अंतरावर रडारवरून गायब झाले आणि हवाई वाहतूक नियंत्रकांशी संपर्क तुटला.
गेल्या काही दिवसांपूर्वी मेक्सिको सिटीमध्ये धावपट्टीवर एरोमेक्सिकोचे एक प्रादेशिक जेट डेल्टा एअर लाइन्सच्या बोईंग 737 जेटशी जवळजवळ आदळले होते. ही घटना घडली तेव्हा एरोमेक्सिको विमान लँडिंगसाठी येत होते. तेव्हा ते डेल्टा एअर लाइन्सच्या बोईंग 737 जेटसमोर आले.