महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस उपायुक्त ढुमेला तत्काळ बडतर्फ करा!

महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच पोलीस उपायुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी अश्लील प्रकार केल्याचे संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहे. त्यामुळे ढुमे यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. डॉ. नीलम गोऱहे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ढुमे यांनी संभाजीनगरमध्ये एका गाडीत एका ओळखीच्या महिलेशी अश्लील चाळे केले आणि घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली आहे. त्या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.