परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षांशी केलं हस्तांदोलन, व्हिडीओ व्हायरल

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ते पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांची ही पहिलीच भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन झालं. यातच खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ढाका येथे पोहोचले होते. अंत्यसंस्कारादरम्यान त्यांनी खालिदा झिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान यांची भेट घेतली. याचवेळी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांची भेट घेतली आणि हस्तांदोलन केलं. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.