एनसीपीएमध्ये ‘साज-ए-बहार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने (एनसीपीए) हिंदुस्थानी वाद्य संगीताचा महोत्सव ‘साज-ए-बहार’ आयोजित केला आहे. 8 एप्रिलपासून या दोन दिवसीय महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये रुद्रवीणा, सारंगी, बासरी आणि तबला या वाद्यांचा आनंद घेता येईल. तसेच डॉ. सुवर्णलता राव यांचे विशिष्ट वाद्यांवरचे वैशिष्टय़पूर्ण विवेचन ऐकता येईल. 8 एप्रिल रोजी तबलावादक अक्रम खान यांचे सादरीकरण झाले. बासरीवादक रोणू मुजुमदार यांनीही बासरीच्या सूरांनी मंत्रमुग्ध केले. 9 एप्रिल रोजी मोही बहाउद्दीन डागर यांचे रुद्रवीणावादन आणि दिलशाद खान यांचे सारंगीवादन होईल. मोही बहाउद्दीन डागर यांनी वडील झिया मोहिउद्दीन आणि काका झिया फरीदुद्दीन डागर या उस्तादांकडे प्रशिक्षण घेतलेले आहे, तर दिलशाद खान यांनी त्यांचे काका उस्ताद सुलतान खान आणि त्यांचे आजोबा गुलाब खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे.