
पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात दम नाही. पाकिस्तान हे इस्लामसाठी लढत आहे असे पाकचे राज्यकर्ते सांगतात. अल्ला तुमच्या पाठीशी असल्याने तुमचा विजय नक्की, असे सैन्यास सांगूनही पाकच्या सैन्यात ऊर्जा निर्माण होत नाही. भारताचा सैनिक राष्ट्रासाठी लढतो आहे. देशच सर्वोच्च ही त्याची भावना आहे. आधी देश, मग देव आणि धर्म नंतर हा त्याचा क्रम आहे. देश राहिला तर देव आणि धर्माचे रक्षण होईल. भारतीय सैन्याचे बोधवाक्य आहे, ‘सर्वोपरि सेवा’. याचा अर्थ स्पष्ट आहे की, सैनिक स्वतःपेक्षा राष्ट्राची सेवा प्रथम करतात. भारतीय सेना हाच भारताचा कणा आहे. ज्याच्या भरवशावर भारत ताठ मानेने जगासमोर उभा आहे. राज्यकर्ते, सरकारे, नेते येतात आणि जातात!
भारताने पाकिस्तानवर चौफेर हल्ला केला आहे. त्यात पाकिस्तानची दाणादाण उडून त्यांचे सरकार बिळात गेले आहे. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटले असताना ‘सेनापती’ म्हणजे लष्करप्रमुखालाच बदलण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. लष्करप्रमुख जनरल मुनीर याला बडतर्फ करून अटक करण्यात आली व त्याच्या जागी पाकिस्तानने नवा लष्करप्रमुख नेमला आहे. अशा बातम्या आल्या. पाकिस्तानची ही सध्याची अवस्था आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचे समर्थन करण्यात जनरल मुनीर आघाडीवर होता व मुनीरमुळेच पाकिस्तानवर युद्धाचे संकट कोसळल्याची भावना पाकी जनतेत आणि लष्करात आहे. पाक लष्करातच मुनीरविरोधात बंड झाले आहे. पाक लष्कराच्या कमांडरांचे म्हणणे आहे की, भारताशी ‘पंगा’ घेणे वेगळे आणि युद्ध करणे वेगळे. पाक लष्कराची कोणतीच तयारी नसताना भारताने त्यांना युद्धाच्या रणात खेचले. पाकचे सैन्य युद्धाच्या तयारीत नाही. भारतात घुसण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘थेट’ कबरीत घुसण्यासारखेच आहे याची खूणगाठ पाकी सैन्याने बांधलीच आहे. अशा मनाने हरलेल्या सैन्याचा रणात निभाव लागणे कठीण आहे. बलुचिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील पाकिस्तानी सेनेचे कोर कमांडर भारताविरुद्ध युद्ध लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे पाकिस्तान पांगळे झाले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, 48 तासांत पाकचे पंबरडे मोडले. त्यांचे सर्व सुरक्षा कवच उद्ध्वस्त झाले. पाकने भारतावर डागलेले ड्रोन भारताने हवेतच नष्ट केले. पाकच्या सर्व वल्गना, डरकाळ्या फोल ठरल्या आहेत. भारताच्या ड्रोन हल्ल्यासमोर पाकची एअर डिफेन्स सिस्टीम तग धरू शकली नाही. या सगळ्यात
उघडा पडलाय
तो चीन. पाकिस्तानने चीनकडून ‘एचक्यू-9’ ही एअर डिफेन्स सिस्टीम मिळवली होती. भारतीय हल्ल्यात हे सर्व नष्ट झाले. चीनने पाकला दिलेली ‘जे 17’ सारखी फायटर विमाने भारताने पाडल्यावर आता चीनच्या लष्करी सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाकची ही दाणादाण बघून जगातील मुस्लिम राष्ट्रांनी हात वर केले. सर्व इस्लामी राष्ट्रे आपल्या पाठीशी उभी राहतील अशी पाकड्यांना अपेक्षा होती. पाकचे प्रतिनिधी इस्लामी राष्ट्रांचे दरवाजे ठोकीत राहिले, पण कोणीच प्रतिसाद द्यायला तयार नाही. 57 इस्लामिक देशांचे संघटन ‘ओआयसी’ने तातडीची बैठक बोलावली, पण पाकला पाठिंबा पिंवा मदतीचा हात पुढे करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. सौदी अरब, कतार, पुवेतसारखी राष्ट्रेही मौन बाळगून आहेत. इराक-सीरियासारखी राष्ट्रे आपल्याच देशातील गृहकलहाने बेजार आहेत. अफगाणिस्तानला पाकडय़ांशी देणे-घेणे नाही. तुर्पमेनिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तानसारख्या राष्ट्रांना भारत-पाकच्या झगडय़ात पडायचे नाही. तुर्पस्तानचा कल आज पाकडय़ांच्या बाजूने असला आणि त्यांनी कितीही ‘ड्रोन’ पाकड्यांना पुरवले तरी भारतीय सैन्यापुढे ते टिकाव धरू शकणार नाहीत. मुळात अद्याप प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेले दिसत नाही. कारण पाकिस्तानचे सैन्य अद्याप झोपेतून उठलेले नाही. भारताची चाल अशी दिसते की, ‘war of attrition’ म्हणजे युद्धात शत्रूला झिजवून मारायचे. पाकिस्तानचे सैन्य आधीच झिजलेले आहे. भारताने युद्ध लांबवले तर ते मैदान सोडून पळून जाईल. चीन उघडपणे पाकला मदत करण्याची शक्यता आज दिसत नाही. त्यामुळे युद्धाच्या धमक्या पाकिस्तानच्या अंगाशी आल्या आहेत. अशा परिस्थितीत
जागतिक शांतता धोक्यात
येऊ नये या उच्च हेतूने प्रेरित होऊन एखाद्या बडय़ा राष्ट्राला मध्यस्थ म्हणून घ्यायचे आणि एकतर्फी युद्धबंदीची घोषणा करायची हाच मार्ग पाकपुढे राहतो. अशा वेळी भारताने पाककडून काय साध्य करून घ्यायचे? मसूद अजहर, दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमनसह अनेक दहशतवादी जे भारताला हवे आहेत व पाकिस्तानने त्यांना आश्रय दिला आहे, ते सगळे भारताच्या ताब्यात दिल्याशिवाय युद्ध थांबवणार नाही ही भूमिका घेऊन पाकडय़ांची दहशतवादाची फॅक्टरी कायमची उद्ध्वस्त केली पाहिजे. इंदिरा गांधी यांनी 1971 च्या युद्धात पाकचा तुकडा पाडून बांगलादेश हे नवे राष्ट्र निर्माण केले. त्याप्रमाणे आता बलुचिस्तान हे नवे राष्ट्र उदयास आणून पाकला कमजोर करण्याची ही संधी आहे. पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात दम नाही. पाकिस्तान हे इस्लामसाठी लढत आहे असे पाकचे राज्यकर्ते सांगतात. अल्ला तुमच्या पाठीशी असल्याने तुमचा विजय नक्की, असे सैन्यास सांगूनही पाकच्या सैन्यात ऊर्जा निर्माण होत नाही. त्यामुळे भारताबरोबर हे धर्मयुद्ध आहे ही पाकची योजना इतर इस्लामी राष्ट्रे स्वीकारायला तयार नाहीत व पाकचे सैन्यही त्यासाठी लढायला तयार नाही. धर्मासाठी मरा असे सांगणे हा रानटीपणा आहे. भारताचा सैनिक राष्ट्रासाठी लढतो आहे. देशच सर्वोच्च ही त्याची भावना आहे. आधी देश, मग देव आणि धर्म नंतर हा त्याचा क्रम आहे. देश राहिला तर देव आणि धर्माचे रक्षण होईल. भारतीय सैन्याचे बोधवाक्य आहे, ‘सर्वोपरि सेवा’. याचा अर्थ स्पष्ट आहे की, सैनिक स्वतःपेक्षा राष्ट्राची सेवा प्रथम करतात. भारतीय सेना हाच भारताचा कणा आहे. ज्याच्या भरवशावर भारत ताठ मानेने जगासमोर उभा आहे. राज्यकर्ते, सरकारे, नेते येतात आणि जातात!