सचिन शोधतोय चेन्नईतील वेटरला, क्रिकेटशौकीन वेटर चेन्नईत भेटला होता तेंडुलकरला

635

‘विक्रमादित्य’ सचिन तेंडुलकर त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि कलात्मकता वाढवण्यास मदत करणार्‍या एल्बो गार्डच्या डिझाईनची सूचना करणार्‍या हॉटेलमधील वेटरचा शोध घेतोय. या वेटरच्या सूचनेमुळे आपल्याला मनगटी फटके अधिक प्रभावीपणे मारता आले असे सचिनने स्पष्ट केले आहे.

सचिनने सोशल साइटवर जरी केलेल्या एका व्हिडीओत त्याला एल्बो गार्डचे डिझाईन बदल अशी सूचना करणार्‍या चेन्नईच्या वेटरचे खास आभार मानले आहेत. एका कसोटी मालिकेत खेळत असताना चेन्नईतील हॉटेलमध्ये हा वेटर आपल्याला भेटला होता. तो कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये आला होता. त्याने तुझ्या एल्बो गार्डचे डिझाईन बदल असा सल्ला मला दिला होता. मी त्याचा सल्ला मानून एल्बो गार्डचे स्वरूप बदलल्यावर माझ्या फलंदाजीत अधिक कलात्मकता आणि आक्रमकपणा आला, असे सचिनने म्हटले आहे.

जगातला पहिला क्रिकेटशौकीन, ज्याने माझ्या तंत्रातील कमतरता हेरली!

सचिन आपल्या व्हिडीओ संभाषणात पुढे असेही म्हणाला की, माझ्या फलंदाजीच्या तंत्रातील उणीव अचूक हेरून मला एल्बो गार्ड बदलायला सांगणारा वेटर जगातला पहिला क्रिकेटशौकीन होता. त्याचे म्हणणे मीही मानले आणि मला त्याचा लाभ झाला म्हणून मी त्या वेटरला शोधतोय. कुणाला त्याचा थांगपत्ता लागला तर मला जरूर कळवा, अशी विनंतीही सचिनने क्रिकेटशौकिनांना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या