
कात व्यवसायिक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी सुरू असताना वनविभागाने केलेल्या तपासणीत खैराचा अवैध साठा आढळून आला आहे.त्यामुळे सचिन पाकळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीची कार्यवाही सुरू असताना त्यांना त्याठिकाणी खैराचा साठा आढळून आला.ईडीने तपासणीसाठी वनविभागाला पाचारण केले.त्यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांनी तपासणी केली असता त्यांना खैराचा अवैध साठा आढळून आला.त्यामुळे वनविभागाने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परिक्षेत्र वनअधिकारी सरवर खान यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वीच ईडीने सचिन पाकळे यांच्या व्यवसायावर धाड टाकून कारवाई केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ माजली होती.चिपळूण तालुक्यातील सावर्डे आणि खेड तालुक्यातील सुकविली येथे हि कारवाई करण्यात आली होती.सचिन पाकळे यांचे पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत आणि शिंदे गटाशी जवळचे संबंध असल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.



























































