सचिन पायलट व सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट, उमेदवारी अर्जातून धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजस्थानच्या टोंक मतदारसंघातून मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पायलट यांनी त्या प्रतिज्ञापत्रात स्वत:ला घटस्फोटीत म्हटलं आहे. याचा अर्थ सचिन पायलट व त्यांच्या पत्नी सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट झाला आहे.

सारा अब्दुल्ला या नॅशनल जम्मू काश्मीरचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. सचिन आणि सारा यांनी 2004 साली लग्न केलं होतं. त्या दोघांना आरन आणि विहान अशी दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचा उल्लेख पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. याआधीही अनेकदा सचिन व सारा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रत्येकवेळी त्या अफवा निघाल्या. मात्र आता खरंच या दोघांचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सचिन पायलट यांच्याकडे 7.5 कोटींची संपत्ती

सचिन पायलट यांच्याकडे एकूण 7.5 कोटींची संपत्ती आहे. याआधीच्या निवडणूकीत म्हणजेच 5 वर्षांपूर्वी 3.8 कोटी संपत्ती होती.