सचिन तेंडुलकर मुंबई क्रिकेटला तारणार;‘एमसीए’च्या नव्या कार्यकारिणीला करणार मार्गदर्शन

430

गेल्या काही काळामध्ये मुंबईच्या क्रिकेट संघाला स्थानिक स्पर्धांमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या निराशेच्या गर्तेतून मुंबईला बाहेर काढण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर पुढे आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीकडून येत्या 10 ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये मुंबई क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी सचिन तेंडुलकर मार्गदर्शन करणार आहे.

सचिन तेंडुलकरचे मुंबईतील क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. नव्या कार्यकारिणीला भेटण्यासाठीही तो लगेच तयार झाला. मुंबईतील क्रिकेटसाठी महत्त्वाच्या सूचना तो यावेळी देणार आहे असे सूत्रांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. जगामध्ये कोणाला सचिन तेंडुलकरचा सल्ला नकोय. मुंबई क्रिकेटसाठी त्याने खूप काही केले आहे. आता मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी त्याचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या