चेंडू स्टम्पला लागल्यास फलंदाजाला बाद द्यावे, सचिन तेंडुलकरची आयसीसीला सूचना

1284

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने डीआरएसशी निगडीत असलेल्या नियमाबाबत आयसीसीला सूचना करताना म्हटले की, डीआरएस नियमामध्ये चेंडूचा 50 टक्के भाग हा स्टम्पला आदळत असेल त्यानंतरच मैदानातील पंचांचा निर्णय बदलला जातो. पण ही टक्केवारी कमी असेल तर मैदानातील पंचांनी घेतलेला निर्णयच कायम ठेवण्यात येतो. पण असे होऊ नये. चेंडूचा छोटासा भाग जरी स्टम्पला लागत असेल, तर फलंदाजाला बाद द्याके असे सचिन तेंडुलकरला वाटते.

मैदानातील पंचांच्या निर्णयावर नाराज असल्यामुळेच गोलंदाज रिव्ह्यूची मागणी करतो. त्यामुळे चेंडू किती प्रमाणात स्टम्पवर आदळतोय हे बघण्यात अर्थ नाही. चेंडूचा स्पर्श जरी स्टम्पला होत असेल तर त्या फलंदाजाला बाद देण्यात यावे, असे सचिन तेंडुलकरने ब्रायन लाराशी सोशल मीडियावर संवाद साधताना म्हटले आहे. हरभजन सिंगनेही सचिन तेंडुलकरच्या सूचनेला थम्स अप दाखवला आहे.

टेनिसची पुनरावृत्ती क्रिकेटमध्येही व्हावी
– टेनिस या खेळामध्ये बॉल कोर्टच्या आत किंवा बाहेर पडला हे बघितले जाते. चेंडू किती टक्के आत आहे किंवा बाहेर आहे हे बघितले जात नाही. अगदी तसेच क्रिकेटमध्येही व्हावे, असे सचिन तेंडुलकरला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या