
सामना ऑनलाईन । भोपाळ
भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांना आज तुरुंगात त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी भाजपच्या सभेत सांगताना अश्रू अनावर झाले. भोपाळमध्ये आज साध्वी प्रज्ञा यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तिथे बोलत असताना त्यांनी तुरुंगात त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली.
#WATCH: Alleging torture by jail officials, Sadhvi Pragya Singh Thakur, BJP Lok Sabha candidate from Bhopal, breaks down while addressing the party workers pic.twitter.com/UVUomvmJZ2
— ANI (@ANI) April 18, 2019
‘जेव्हा पोलीस मला घेऊन गेले. त्यांनी पहिले 13 दिवस मला बेकायदा तुरुंगात डांबले. पहिल्याच दिवशी मला काहीच न विचारता त्यांनी मला बोलावले आणि मारायला सुरुवात केली. एका मोठ्या पट्ट्याने त्यांनी मला मारायला सुरुवात केली. तो पट्टा एवढा जाडा होता की त्याच्या एका फटक्यानेच मी सुन्न पडायचे. एका फटक्यातच हाताचे पंजे सुजून जाड व्हायचे. त्याचा दुसऱा फटका पडला तर हात फाटेलच. असे फटके मला दिवस रात्र मारले जायचे. मी तुमच्यासमोर माझं दुख मांडत नाही. पण मला जो त्रास झाला तो त्रास दुसऱ्या कुठल्याही बहिणीला भोगावा लागू नये. मारता मारता घाणेरड्या शिव्या द्यायचे.तुला निर्वस्त्र करू, उलटं लटकवू अशा धमक्या द्यायचे’, असे सांगताना साध्वी प्रज्ञा यांना अश्रू अनावर झाले.
Pragya Singh Thakur while alleging torture by jail officials says, “Vo kehalvana chahte the ki tumne ek visfot kiya hai aur Muslimo ko maara hai…..subah ho jati thi pit’te pit’te, log badal jate the peetne wale, lekin pitne wali main sirf akeli rehti thi.” pic.twitter.com/C0T8rzByVn
— ANI (@ANI) April 18, 2019
तुरुंगात त्यांच्यावर मालेगाव स्फोट त्यांनीच घडवला यांची कबूली देण्यासाठी दबाव टाकला जायचा असा आरोपही यावेळी साध्वींनी केला ‘मालेगाव स्फोट मीच घडवला व मुस्लिमांना मीच मारलं हे त्यांना माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मला मारता मारता सकाळ व्हायची पण ते मला मारतंच राहायचे. मारणारी लोकं बदलायची पण मार खाणारी मी एकटीच असायचे’, अशा शब्दात त्यांनी त्यांचे दु:ख व्यक्त केले.






















































