दहशतवाद्याचा नाश करण्यासाठी संन्याशाला पुन्हा यावे लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशच्या भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अजूनही सुरूच ठेवली आहे. ‘दहशतवाद्याचा नाश करण्यासाठी पुन्हा एकदा संन्याशाला यावे लागले’, अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्यावर हल्ला चढवला आहे.

सिहोर या ठिकाणी निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 16 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत उमादीदी यांनी दिग्विजय यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा उभे राहता आले नव्हते, राजकारणही करता आले नाही. आता पुन्हा त्याने डोके वर काढले आहे. अशा दहशतवाद्याचा नाश करण्यासाठी पुन्हा एकदा संन्याशालाच यावे लागले असे ठाकूर म्हणाल्या. दरम्यान, याआधी ठाकूर यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.