
मोहन सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट (18 जुलै) ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातील कलाकरांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. खासकरुन तरुणाईमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रत्येक प्रेमात असलेल्या किंवा नव्याने प्रेमात पडू पाहणाऱ्या तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सुखासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय.
अहान पांडेच्या या पहिल्या वहिल्या चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवले आहे. अनेक सुपरस्टार्सना त्याने मागे टाकत स्वतःचा ठसा उमटवला आहे. हा चित्रपट पाहून तरुण पिढी प्रामुख्याने Gen Z खूपच भावूक झालेले आहेत. या चित्रपटातील अनेक फेमस डायलाॅग आणि गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ पाडलीय. सोशल मीडियावर सध्या सैय्याराची चर्चा म्हणून अधिक दिसत आहे.
अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा यांचा हा पहिला सिनेमा असला तरी, दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या वर्षी ‘छावा’ या चित्रपटांनंतर एवढ्या कमी वेळात करोडोंचा गल्ला जमवणारा म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.
अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 21 कोटी, दुसऱ्या दिवशी 25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 37 कोटींचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘सैयारा’ हा एक मोठा हॅशटॅग बनला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक खूप भावनिकही होत आहेत. यासंदर्भातील थिएटरमधील काही व्हिडिओ देखील समोर येत आहेत. ‘सैयारा’ची मागणी इतकी वाढली आहे की, चित्रपटाचे शोची मागणीही त्यामुळे वाढली आहे.
अवघ्या सात दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 172 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर जगभरातून ‘सैयारा’ची कमाई सुमारे 240 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.