आमच्या मुलीवर लाईन मारू नकोस! हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या

हिंदुस्थानच्या महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चांगलीच चर्चेत आहे. द हंड्रेड या टूरमध्ये ती आपला दिमाखदार खेळ दाखवत आहे. तिच्या याच खेळाचं कौतुक करणाऱ्या इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जला मात्र नेटकऱ्यांनी कोपरखळ्या मारल्या आहेत.

सध्या द हंड्रेड या स्पर्धेत मॅनचेस्टर ओरिजिनल्स आणि ओव्हल इनविन्सिबल्स या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळवला गेला. मॅनचेस्टर कडून खेळणाऱ्या हरमनप्रीत कौर हिने 29 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यात तिने सहा चौकारही चोपले. दुर्दैवाने ओव्हल संघाकडून खेळणाऱ्या टॅश फॅरेंट या खेळाडूने तिला बाद केलं.

हा सामनाही ओव्हल संघ जिंकला. मॅनचेस्टर संघाने प्रथम फलंदाजी निवडली आणि 6 गडींच्या बदल्यात 135 धावा केल्या. त्यांचा पाठलाग करताना ओव्हल संघाने 5 गडी बाद 139 धावांची खेळी करून सामना खिशात घातला.

या सामन्यात मॅनचेस्टरचा पराभव झाला असला तरीही हरमनप्रीतच्या फलंदाजीची चर्चा रंगली. इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्ज यानेही तिच्या खेळीचं कौतुक करत ती एखाद्या बंदुकीप्रमाणे असल्याचं म्हटलं.

झालं, नेटकऱ्यांना तेही निमित्त पुरेसं ठरलं. नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेत तिच्यावर शायनिंग मारायच्या फंदात पडू नकोस, असा सल्ला दिला. आमच्या मुलीवर लाईन मारणं बंद कर, ती तुझ्याशी लग्न करणार नाही, अशा पद्धतीने नेटकऱ्यांनी सॅमला कोपरखळ्या मारल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या