‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’विरोधात समीर वानखेडे हायकोर्टात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी वेबसीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या वेबसीरिजमधून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत वानखेडे यांनी शाहरुख खान, गौरी खान आणि नेटफ्लिक्स यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. वानखेडेने शाहरुख, कंपनी रेड चिलीज आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या निर्मात्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे.

समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका शाहरुख खान आणि गौरी खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर अनेकांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.