Samsung Galaxy M62 – 7000mAh बॅटरीचा दमदार फोन लॉन्च

जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपला दमदार बॅटरी असणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M62 असे या फोनचे नाव असून फोनसोबत 7000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. थायलंडमधील अधिकृत वेबसाईटव हा फोन सध्या लॉन्च झाला असून गेल्या आठवड्यात हिंदुस्थानात लॉन्च करण्यात आलेल्या गॅलेक्सी एम62 चा हे रिब्रांडेड व्हर्जन आहे.

फीचर्स

– 6.7 इंचाचा फुलएचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले (प्रोसेसरबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही)
– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (मायक्रो कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येणार)
– 7000 एमएएचची बॅटरी
– निळा, काळा आणि हिरवा अशा तीन रंगात उपलब्ध

samsung-galaxy-m62-new

कॅमेरा

Samsung Galaxy M62 मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सल, तिसरा 5 मेगापिक्सल आणि चौथाही 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, यासोबत पंच होल कटआऊटही देण्यात आले आहे.

samsung-galaxy-m62-camera

किंमत

सध्या हा फोन फक्त थायलंडमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर झळकला आहे. वेबसाईटवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिसत असून किंमतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या