राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटी सदस्य संदीप गिड्डे शिवसेनेत

877

राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटी सदस्य संदीप गिड्डेंनी 23 सप्टेंबरला ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संदीप गिड्डे यांच्यासह लातूर मजदूर महासंघाचे लक्ष्मण वंगे, पुणे किसान क्रांती राज्य समन्वयकचे नितीन थोरात, दिलीप पाटील, कोल्हापूर बळीराजा संघटनेचे राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे अरुण कान्हेरे, संतोष पवार, अतिश गरड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत,  शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या