सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील आरोपीचे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पलायण केल्याची घटना घडली. सुनील राठोड असे पलायण केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तासगाव येथील एका खून प्रकरणी राठोड पती-पत्नीला अटक करण्यात आली होती. आरोपी पसार झाल्याच्या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


























































