
सांगली जिल्ह्यात आज नव्याने तब्बल 735 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधिताची एकूण संख्या 13,997 इतकी झाली आहे. दरम्यान आज 23 रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 542 झाली आहे.
सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज नव्याने आढळलेल्या 735 रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 333 रुग्णांचा समावेश आहे. त्यात सांगली शहर 190आणि मिरज शहरात 143 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज 23 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 542 झाली आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13,997 झाली आहे, आज अखेर 7,927 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या 5428 रुग्णावर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.



























































