रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार, परिसरात भितीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

रत्नागिरीत एका बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली आहे. त्यामुळे परिसरार भितीचे वातावरण पसरले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावात एका बिबट्याने गाईवर हल्ला केला आहे. त्यात गाईचा मृत्यू झाला असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने याप्रकरणी दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. बिबटे आता मानवी वस्तीत शिरुन पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. बुधवारी रात्री कळंबस्ते एका गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी गावचे तंटामुक्त अध्यक्ष मज्जिद नेवरेकर यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिली आहे .

फणसवणे पंचक्रोशीत बरीच पाळीव जनावरे मोकाट फिरत असतात. त्यापैकीच ही एक गाय असावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसांपुर्वी कोंड ऊमरे येथील आष्टाचा डबरा या डोहात एक सांबर मृतावस्थेत सापडले होते . त्याच्या पाठी देखील बिबट्या लागला असावा व जीव वाचवण्याच्या नादात डोहात पडुन सांबरचा मृत्यू झाला असावा असा अंदाज काही वयोवृध्द मंडळींनी वर्तविला होता .या परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अनेकांनी पाहीले आहे. त्यामुळे याची दखल वनविभागाने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.