संजय दत्त ‘रासप’मध्ये, जानकर यांचा दावा

350

अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. शिवाजी पार्क येथील रासपच्या मेळाव्यात संजय दत्त प्रवेश करणार होता, पण काही कारणास्तव तो येऊ शकला नाही असेही जानकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या मेळाव्यात संजय दत्तच्या शुभेच्छांची चित्रफीत दाखविण्यात आली. त्यामुळे संजूबाबाच्या रासप प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागली आहे.

भाजपच्या चिन्हावर लढणार नाही
रासप भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही असे सांगून विधानसभेसाठी आम्हाला 14 जागा मिळायला हव्यात अशी मागणीही जानकर यांनी यावेळी केली. 14 जागा मिळाल्या तरच रासपला मान्यता मिळेल. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये रासपला राजकीय पक्ष म्हणून मान्यता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या