
महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. तत्पूर्वी शिवसेना कार्यालयापासून वाजत गाजत हजारो महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तहसील कार्यालयापर्यंत आले. त्यानंतर आमदार संजय रायमुलकर यांनी खासदार प्रतापराव जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, प्रा. बळीराम मापारी, भाजपा तालुका अध्यक्ष अॅड. शिव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी गणेश राठोड यांचेकडे उमेदवारी अर्ज दिला.
































































