संजय राऊत यांची आज खास मुलाखत

533
sanjay-raut-action

पुण्यातील पत्रकारांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांची खास मुलाखत या कार्यक्रमात होणार आहे.

टिळक स्मारक येथे बुधवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची विशेष उपस्थिती आहे. पुणे शहर आणि जिह्यात काम करणाऱ्या सर्व मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिकांतील पत्रकार, ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार तसेच मुद्रित माध्यमांसाठी शोधपत्रकारिता यासाठी विविध गटामधून स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्या होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या