महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार

एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे सर्व प्रमुख पक्ष निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतील. फॅशन स्ट्रीटवरून दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा निघेल आणि मेट्रोच्या मार्गे मुंबई महापालिकेजवळ व्यासपीठ उभे केले आहे, तिथपर्यंत पोहोचेल. प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरुद्ध पुढील रणनीतीची घोषणा केली जाईल, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आम्ही 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार असून महाराष्ट्रात आम्ही ज्या गोष्टी समोर आणल्या त्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही दिल्लीला आमची ताकद दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही हे निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. मतदार यादीमध्ये लाखो बोगस नावे टाकली जात आहेत. ही कोणती लोकशाही आहे. याविरोधात आमची लढाई सुरू असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

सर्वपक्षीय मोर्चाची बैठका सुरू असून कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा झाली. मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा झाली. काँग्रेस या मोर्चात ताकदीने सहभागी होईल. या मोर्चात सर्व पक्षांचे झेडे दिसतील, असेही राऊत म्हणाले.

1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार

देशाची संपत्ती अदानीच्या चरणावर, एलआयसीचं कुठे घेऊन बसला?

अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) वापर केला. एलआयसीवर दबाव आणून ‘अदानी’च्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले गेले, असे धक्कादायक वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाची संपत्ती, बजेट अदानीच्या चरणावर टाकलेले आहे. त्यामुळे एलआयसीचे कुठे घेऊन बसता.

मोदी सरकारचे एकच धोरण… अदानी के साथ भी! अदानी के बाद भी!! ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची खळबळ! दबावामुळेच एलआयसीने गुंतवले अदानीच्या कंपन्यांमध्ये 34 हजार कोटी