
शहा सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी यांत्रिकी सफाई व मनुष्यबळ पुरवठ्याच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागात तब्बत दीड हजार कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. मिंधे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ईडी चौकशीमुळे ज्या कंपन्यांना सरकारी कामाचा ठेका देण्यास बंदी घातली होती त्यांना पात्र ठरविण्याचा प्रताप मंत्री शिरसाट यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारताच त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
”माझी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून काहीही अपेक्षा नाही. संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय गायकवाड, संदीपान भुमरे यांच्या विरोधात ते काहीही करत नाही. एवढे हतबल मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते. कशाला आहे तुमचं अॅन्टी करप्शन खातं. भ्रष्टाचाऱ्यांचे पैसे मोजायला ठेवलंय का हे खातं. मुख्यमंत्री दयनीय आणि हतबल अवस्थेत आहेत. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता, तुम्ही मंत्री,आमदार खासदारांवर का कारवाई का करत नाही. माझा देवेद्र फडणवीसांना हा प्रश्न आहे की सकारमध्ये नैतिकता उरली असेल तर जे मंत्री सरकारचं पैशाच्या बॅगा उघड्या ठेवून सिगारेटचे धूर सोडत बसले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर दीडशे एकर जमीन कशी आली ते कोणालाच कळलं नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. एकदिवस शिंदे सुद्धा म्हणतील मला भुमरे यांच्या गाडीचा ड्रायव्हर व्हायचा आहे. किंवा त्यांना अमित शहा यांच्या गाडीचा ड्रायव्हर व्हाचे असेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
”मला राळेगणसिद्धीला जाऊन अण्णा हजारेंना उठवायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की त्यांनी आता उठायला हवं. त्यांना असं वाटत असेल की महाराष्ट्रात आबादी आबाद चालली आहे तर तसं नाहीय. त्यामुळे आता मी त्यांना उठवणार आहे”, असे संजय राऊत म्हणाले.