विदर्भ तोडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना मिंध्यांचा छुपा पाठिंबा – संजय राऊत

”चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की विदर्भ वेगळा करण्याचे आमचे काम सुरू आहे. फडणवीस त्यावर काम करतायत. यावर यावर स्वत:ला शिवसेना म्हणवून घेणारा मिंधे गटाचा एकही आमदार बोलत नाही म्हणजे हे शहांचे मिंधे आहेत. बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे थंडगार लोळागोळा होऊन पडले आहात याचा अर्थ याला तुमचा छुपा पाठिंबा आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व मिंध्यांची सालटी काढली. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी विधी मंडळातील विरोधी पक्ष नेतेपद व वेगळा विदर्भ या मुद्द्यांवरून राज्य व केंद्र सरकार तसेच भाजपवर सडकून टीका केली.

”आज मुंबई विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की विदर्भ वेगळा करण्याचे आमचे काम सुरू आहे. हा आमचा अजेंडा आहे. फडणवीस त्यावर काम करतायत. मिंधे गटाचा एकही आमदार जे स्वत:ला शिवसेना म्हणून घेणारा आमदार उठला नाही म्हणजे हे शहांचे मिंधे आहेत. बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे थंडगार लोळागोळा होऊन पडले आहात याचा अर्थ याला तुमचा छुपा पाठिंबा आहे. पालघरमध्ये गुजरात पुर्णपणे घुसलाय, पालघरच्या सीमा ओलांडून त्यांनी आत प्रवेश केला आहे. ते अजून पुढे येतील तिथे काम करणारे सर्व ठेकेदार त्यांचे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यांनी डहाणू, पालघरवर दावा ठेवला होता. त्यामुळेच त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून तिथे लक्ष ठेवायला हवं. महाराष्ट्र म्हणजे फडणवीस सरकार नाही. ते गुजरातचे मिंधे आहेत”, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.

”या संदर्भात वडेट्टीवारांच्या भूमिकेला आम्ही फार महत्त्व देत नाही. वेगळा विदर्भ होणार नाही. महाराष्ट्र एकसंध राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांची सहमती आहे. काँग्रेसने किती आपटलं तरी वेगळा विदर्भ होणार नाही. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्राचे तुकडे होणार नाहीत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे तुकडे होणार नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.

”विधीमंडळ व संसदेतील कामकाजाची सर्कस झाली आहे. संसदेत प्रियांका गांधी, विरोधी पक्ष राहुल गांधीच्या चर्चेत जान आली. लोकशाही जिवंत असल्याचे भान आले. संसदीय लोकशाही मध्ये महानगरपालिका, जिल्हापरिषदा असो तिथे विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षात विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचा नाही. त्यानुसार निकालांची मांडणी करायची हे शहा मोदींनी ठेवले आहे. तरिही राहुल गांधींनी त्यांचे 100 खासदार निवडून आणले. आमचे सर्व मिळून आता लोकसभेत 240 खासदार निवडून आणल्याने त्यांना विरोधी पक्ष नेते पद द्यावे लागलं. महाराष्ट्रात विधानसभा विधानपरिद अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते पद नाही याची सत्ताधार्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज पुढे नेले जातेय याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरताय. तुमची सालटी काढली जाते, तुमच्या चूका काढल्या जातात. तुम्हाला प्रस्न विचारले जातात. लोकशाहीत महत्त्वाचं साधन आहे. महाराष्ट्रात फडणवीसांना व केंद्रात मोदी शहांना लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळायचे नाहीत. संसदेत भाजपचे अत्यंत कमी लोकं असताना देखील विरोधी पक्षनेता पद दिले गेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

”राहुल गांधी विरोधी पक्षनेते असल्यामुळे भाजपचे जे धिंडवडे निघत आहेत. त्यामुळे अमित शहांपासून सर्व हादरले आहेत. वंदे मातरमवर जी चर्चा सुरू केली त्यात सर्वात जास्त बुरखे भाजप व संघाचे फाटले गेले. आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हतात तुम्हाला यावर चर्चा करण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राचे गीत आहे जय जय महाराष्ट्रावर चर्चा व्हायला हवी त्यानंतर सगळ्यांना कळेल की महाराष्ट्र कुणाचा व महाराष्ट्रासाठी कुणी बलिदान केलं. आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, मुंबई कशी लुटली जातोय ते देशाला समजलं पाहिजे. मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच नव्हता”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.