शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या ढोंगीपणावर बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले. ”भाजपच्या मंत्रीमंडळात दोन असे मंत्री आहेत त्यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे आहेत. यातील महिलेने आत्महत्या देखील केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आधी त्या’ मंत्र्यांचा राजीनामा घ्याव्या व नंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
”भाजपकडे सध्या काही काम नाहीए. ती एक भ्रमिष्ट पार्टी आहे. या राज्यात यांचं सरकार आल्यापासून महिलांच्या अत्याचारावर वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर 27 ठिकाणी तशाप्रकारचे अत्याचार झाले. त्याविषयी प्रश्न विचारले की ते विरोधकांविरोधात बनावट प्रकरण निर्माण करतात. ते स्वत:ला भाजपचे कार्यकर्ते म्हणवून घेतात ते खरंतर पगारी नोकर आहेत. महाविकास आघाडी विरोधात ते ज्या भूमिका घेतात. त्या बनावट आहेत. त्यांच्या सरकारमध्ये अशा प्रकारचे आरोप असलेले दोन मंत्री आहेत. नुसते आरोप नाही. त्या महिलांनी आत्महत्या केल्या होत्या, ते मंत्री भाजपच्या मंत्रीमंडळात आहेत. फडणवीसांनी आधी त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्याव्या व नंतर नंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्यात’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.