
भाजपकडून ईडी व सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांवर कारवाया केल्या जात आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून भाजपला एक इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ या ट्विट सोबत शेअर केला असून त्यातून त्यांनी हा इशारा भाजपला दिला आहे.
समझने वाले को इशारा
काफी हैं…
Ed ची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवांय राहणार नाही..
श्रीमान पोपटलाल!
Mark my words.. https://t.co/RVV4aPexcR— Sanjay Raut (@rautsanjay61) March 10, 2023
”कुछ देर की खामोशी है फिर शोर आयेगा… आपका सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा” असा एक शेर असलेला व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केला असून सोबत त्यांनी भाजपला इशारा देणारी पोस्ट लिहली आहे. ”समजणाऱ्यांना फक्त इशारे पुरेसे आहेत. ईडीची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवांय राहणार नाही… श्रीमान पोपटलाल! Mark my words..” अशी पोस्ट संजय राऊत यांनी शेअर केली आहे.


























































