भाजप मतचोरी करून निवडणूक निवडणुका जिंकू इच्छिते, उत्तर प्रदेशातही मतदार यादीत घोळ; संजय सिंह यांचा आरोप

उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि घोटाळा झाला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला हे. जनतेतील पाठिंबा गमावलेल्या भाजपला आता मत चोरीद्वारे निवडणुका जिंकायच्या आहेत, असं ते म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेद्वारे मतदार यादीत हेराफेरीचा आरोप केला.

संजय सिंह म्हणाले, “जनतेचा विश्वास गमावलेली भाजप आता मतचोरीच्या मार्गाने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीपूर्वी एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली सुमारे १ कोटी मते कापली जाण्याची शक्यता आहे.” त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्येही मतचोरी करून भाजपने यश मिळवल्याचा आरोप केला.