टिपू सुलतान प्रकरणी सपकाळ यांची दिलगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान करून नवा वाद ओढवून घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अखेर दिलगिरी व्यक्त केली.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱया मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भाजप आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.