सातारा – लाचखोर महिला सरपंचाला अटक

गावात केलेल्या विकासकामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जावली तालुक्यातील दुंद गावच्या सरपंच लक्ष्मी सीताराम गोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी दुंद गावातील बंदिस्त गटर व काँक्रीटचे बांधकाम केले आहे. काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिल काढण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, हे बिल काढण्यासाठी सरपंच लक्ष्मी गोरे यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पडताळणी केल्यानंतर सापळा रचून सरपंच गोरे या 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या