पृथ्वीकडून अवकाशाला ‘हॅपी न्यू इयर’, ISRO ने पाठवला नवा उपग्रह

627

इस्रोने शुक्रवारी सकाळी जीसॅट 30 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. युरोपातील अंतराळ संस्था एरीयानेस्पेसने इस्रोचा हा उपग्रह अंतराळात नेला आहे. पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनी फ्रेंच गुआना अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहामुळे देशातील दूरसंचार सेवा आणखी प्रगत होण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह प्रक्षेपित झाल्यानंतर 38 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला. 3,357 किलो वजनाचा हा उपग्रह इनसॅट-4 ए ची जागा घेणार आहे. हा उपग्रह जुन्या उपग्रहाची नावापुरता जागा घेणार नसून दूरसंचार क्षेत्रात त्यापेक्षा अधिक चांगली सेवा देणार आहे.

या उपग्रहामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आणि खासकरून दुर्गम भागापर्यंत आवाज आणि चित्राची उच्च दर्जाची सेवा पोहचवण्यास मदत होणार आहे. म्हणजेच यामुळे मोबाईल किंवा अन्य संवादाच्या साधनांद्वारे होणारे संभाषण व्यत्ययाशिवाय आणि अधिक चांगल्या दर्जाचे होऊ शकणार आहे, तसेच दूरचित्रवाणी सेवा हे देखील उच्च दर्जाची पुरवणं शक्य होईल. याचा फायदा डीटीएच सेवा आणि डिजिटल वृत्तसेवांना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या