सतीश सावंत यांच्यापाठोपाठ त्यांचे शिलेदारही शिवसेनेत दाखल

1836

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रेवश केल्यानंतर आता त्यांचे शिलेदारही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सोमवारी कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यासह असंख्य कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख तथा  आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.  शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

विजयभवन कणकवली येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यामध्ये सोनवडे तर्फ कळसुली गावचे सरपंच उत्तम बांदेकर, उपसरपंच वामन गुरव, ग्रा. प सदस्य रामचंद्र तेलंग, सोनवडे सरपंच शरद गुरव, माजी सरपंच जनार्दन गुरव दिलीप गुरव, लक्ष्मण चव्हाण, गजानन गुरव, प्रकाश चव्हाण, शरद मोर्ये, सुभाष गुरव, रामचंद्र चव्हाण, काशीराम गुरव, बळीराम गुरव, प्रकाश गुरव, मनोहर गुरव, सुनील चव्हाण, प्रमोद गुरव, रुपेश चव्हाण, हेमंत गुरव, मधुकर मोर्ये, महादेव मोर्ये, महादेव गुरव, किर्तीकुमार  तेलंग, मधुकर वास्कर, विजय देवलकर,  रामचंद्र गुरव, सोनवडे दुर्गनगर येथील शांताराम सावंत, भाई बोभाटे, स्वाभिमान पक्ष बूथ अध्यक्ष  सुरेश सावंत, भास्कर सावंत, यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

यावेळी वैभव नाईक म्हणाले,  पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या स्वाभिमान पक्ष नेतृत्वावर आता त्यांचे कार्यकर्ते विश्वास ठेवणार नाहीत. जो नेता कार्यकर्त्यांचा झाला नाही तो जनतेचा काय होणार त्यामुळे स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्या सर्वांचे मी  पक्षात स्वागत करतो. शिवसेना पक्षात येणाऱ्या सर्वांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख महेश सावंत,  युवासेना विभाग प्रमुख निशांत तेरसे,सोनवडे शाखा प्रमुख गुरु मेस्त्री, सोनवडे ग्रा. प सदस्य दीपक घाडी , रुपेश घाडी, काशीराम घाडी, घोटगे उपसरपंच गीतेश  सावंत, कुपवडे उपसरपंच विजय परब, निलेश परब, भावेश परब आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या